राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय
राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास
प्रश्न. 1. कोण बरे ?
1) अफगाणिस्तानातून आलेले …………
उत्तर :
पठाण
2) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ……………
उत्तर :
रोहिले
3) नानासाहेब पेशव्यांचा भाऊ …………….
उत्तर :
रघुनाथराव
4) मथुरेच्या जाटांचा प्रमुख …………….
उत्तर :
सूरजमल जाट
5) पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे …………..
उत्तर :
माधवराव पेशवा
प्रश्न. 2. थोडक्यात लिहा.
1) अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला
उत्तर :
i) नजीबखान हा रोहिल्यांचा सरदार होता.
ii) त्याला उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व मान्य नव्हते. अब्दालीने नजीबखानाच्या सांगण्यावरून भारतावर पुन्हा स्वारी केली. त्याने राजधानी दिल्ली जिंकून घेतली आणि कोट्यावधी रुपयांची लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला.
iii) पेशव्याने रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांना पुन्हा उत्तरेला पाठवले. त्यांनी प्रथम दिल्ली हस्तगत करून अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला.
iv) तसेच अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठ्यांनी इ. स. 1758 मध्ये अटकेपर्यंत धडक मारली आणि अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला.
2) अफगणांशी संघर्ष
उत्तर :
i) अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते.
ii) इ. स. 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले. या काळात मुघल प्रदेशात अंदाधुंदी निर्माण झाल्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती.
iii) मुघल बादशाहाने मराठ्यांशी केलेल्या करारामुळे मराठे दिल्लीच्या संरक्षणार्थ तेथे पोहोचले. मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले होते.
iv) मराठे अब्दालीच्या अफगाणिस्तान मध्ये होते. त्यांना करारानुसार काबूल, कंदाहार आणि पेशावर हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते.
v) याउलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती. त्यामुळे मराठे आणि अब्दालीचा संघर्ष होणे अटळ होते.
vi) उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा मोहिमेवर गेला.
3) पानिपतच्या लढाईत परिणाम
उत्तर :
i) पानिपतच्या लढाईत विश्वासरावाला गोळी लागून तो ठार झाला. हे सदाशिवरावभाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला. आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला.
ii) त्याचवेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर पराभव झाला.
iii) या लढाईत सुमारे दीड लाख लोक मारले गेले. मराठ्यांची लष्करी शक्ती नष्ट झाली. महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली. अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले.
iv) पानिपतच्या लढाईतील मराठ्यांच्या पराभवाचा धक्का सहन न होऊन पेशवा नानासाहेब यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर पेशवे पद माधवरावाकडे आले. पेशव्याच्या घराण्यात भांडणे सुरू झालीत. त्यामुळे मराठ्यांची शक्ती कमकूवत होत गेली.
v) पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने मुगल साम्राज्याची इतिश्री झाली. तसेच मराठ्यांना हादरा बसल्याने ते मागे हटले.
प्रश्न. 3. घटनाक्रम लावा.
1) राक्षसभुवनाची लढाई
2) टिपू सुलतानचा मृत्यू
3) माधवराव पेशव्यांचा मृत्यू
4) पानिपतची लढाई
5) बुराडी घाटची लढाई
उत्तर :
5) बुराडी घाटची लढाई
4) पानिपतची लढाई
1) राक्षसभुवनाची लढाई
3) माधवराव पेशव्यांचा मृत्यू
2) टिपू सुलतानचा मृत्यू
प्रश्न. 4. पुढील चोकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा.
उत्तर :
1) महादजी
2) जयप्पा
3) नारायण
4) बाळाजी विश्वनाथ
5) दत्ताजी
6) माधवराव
7) सदाशिवराव
8) मल्हारराव
9) जानकोजी