नैसर्गिक साधनसंपत्ती स्वाध्याय
नैसर्गिक साधनसंपत्ती स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा.
1) खनिजसंपत्ती
उत्तर :
i) नैसर्गिक साधनसंपत्तीत खनिजसंपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
ii) पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात.
iii) पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात.
iv) तसेच धातू, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही देखील खनिजसंपत्ती आहे.
2) वनसंपत्ती
उत्तर :
i) नैसर्गिक साधनसंपत्तीमधील वनसंपत्ती ही एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे.
ii) विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्ये आहेत.
iii) जंगलसंपत्तीपासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. तसेच लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यांपासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात.
iv) साबण, सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात. यांशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ वनांतून मिळतात.
v) तसेच वनांमुळे वातावरण शुद्ध राहते. भरपूर ऑक्सिजन मिळतो, पर्यावरणाचा समतोल राहतो.
3) सागरसंपत्ती
उत्तर :
i) समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला ‘सागरसंपत्ती’ असे म्हणतात. सागरजलात, सागरतळावर व सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत.
ii) महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त होते.
iii) सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅगनीज, गंधक, युरेनिअम इत्यादीचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत.
iv) तसेच सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती, मासे मिळतात.
v) सागरतळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
vi) सागरापासून आपल्याला जीवनावश्यक मीठ ही मिळते.
प्रश्न. 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
1) जीवाश्म इंधन म्हणजे काय ? त्यांचे प्रकार कोणते ?
उत्तर :
लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडच्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला. त्याला जीवाश्म इंधन असे म्हणतात.
कोळसा, पेट्रोल, डिझेल, केरोसीन यांसारखे खनिज तेले आणि नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधनाचे प्रकार आहेत.
2) खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.
उत्तर :
खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅप्था, वंगण, डांबर हे घटकपदार्थ मिळतात.
3) जंगलातून आपणांस काय काय मिळते ?
उत्तर :
जंगलातून आपणांस लाकूड, औषधी वनस्पती, डिंक, विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग या वस्तू मिळतात.
4) सागरसंपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश होतो ? त्याचा आपल्याला काय उपयोग आहे ?
उत्तर :
सागरसंपत्तीमध्ये खनिज तेल, रत्ने, शंख, शिंपले, मोती, मासे व मीठ यांचा समावेश होतो.
त्यांचा उपयोग पुढील प्रमाणे आहे.
i) खनिज तेल – खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅप्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे यांच्या निर्मितीत होतो.
ii) रत्ने – रत्नांचा वापर अलंकार तयार करण्यासाठी तसेच शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो.
iii) शंख, शिपले – शंख पवित्र मानल्या जाते. त्याला पूजेत ठेवतात. तसेच शिंपल्यांचा उपयोग औषधनिर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू हस्तकलेच्या वस्तू निर्मितीसाठी केला जातो.
iv) मोती – माती याचा उपयोग अलंकार तयार करण्यासाठी केला जातो.
v) मासे – माशांचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. सुकट, बोबींल यांची भुकटी कोंबड्याचे खाद्य, उत्तम खत म्हणून शेतीसाठी उपयोग करतात. तसेच शार्क, कॉड माशांपासून अ,ड,इ जीवनसत्त्वयुक्त तेलनिर्मिती केली जाते.
vi) मीठ – मीठ हे जीवनाश्यक घटक आहे. याचा उपयोग अन्नपदार्थात, औषध निर्मितीत केला जातो.
5) वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा ?
उत्तर :
i) वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या धूरांतून कार्बन डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू बाहेर पडतात.
ii) या वायूंमुळे हवेतील प्रदूषण वाढते. हे मानवी आरोग्यास हानिकारक असते.
iii) तसेच इंधनाचे साठे ही मर्यादित आहे. त्यामुळे वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा.
6) वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे ?
उत्तर :
i) लोकसंख्या वाढल्यामुळे मानवाने जंगलतोड सुरू केली आहे. वृक्षांच्या तोंडीमुळे जागोजागी सिमेंटचे जंगल उभे होऊ लागले आहे.
ii) वृक्षांच्या होणाऱ्या तोडीमुळे जंगले ओसाड पडत आहे. याचा परिणाम जंगलात अधिवास करणाऱ्या प्राण्यांवर व तेथील वनस्पतींवर होत आहे.
iii) जंगलतोडीमुळे अनेक वनस्पती नष्ट होत आहे. या वनस्पतींवर जगणारे प्राणी, पक्षी हे देखील नष्ट होत आहे. प्राण्यांच्या अनेक प्रजाती आज नष्ट होत आहे. अर्थात वृक्षतोडींमुळे वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे.
7) पाच खनिजांची नावे व त्यापांसून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा.
उत्तर :
खनिजांचे नावे पुढीलप्रमाणे आहे.
i) लोहखनिज ii) मॅगनिज iii) बाॅक्साईट iv) तांबे v) अभ्रक
i) लोहखनिज – त्यांपासून शेतीची अवजारे, रेल्वे रूळ यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळते.
ii) मॅगनिज – मॅगनिजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच विद्युत उपकरणांमध्ये मॅगनिज वापरले जाते.
iii) बॉक्साईट – हे अँल्युमिनिअमचे प्रमुख धातुक आहे. याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
iv) तांबे – तांबे हे शीघ्र विद्युतवाहक आहे, त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो.
v) अभ्रक – औषधे, रंग, विद्युतयंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करण्यात येतो.
8) धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे लिहा.
उत्तर :
धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील टप्पे पुढीलप्रमाणे आहे.
i) धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण केले जाते.
ii) तसेच धातुकांमधील वाळू व मातीची अशुद्धी वेगळी काढली जाते.
प्रश्न. 3. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत ?
उत्तर :
नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.
i) नाइलाजाने एखादे झाड जरी तोडावे लागले, तरी नंतर लगेच नवीन झाड लावून त्याचे जतन केले पाहिजे.
ii) प्राण्यांची बेछूट हत्या थांबवली पाहिजे. यासाठी त्यांचे संरक्षण करावे.
iii) गरजेपुरतेच पाणी वापरावे, पाण्याचे मोल ओळखून पाणी वाया घालवू नये.
iv) जमिनीखाली खनिजे, कोळसा, खनिज तेल यांचे साठे आहेत पण ते मर्यादित आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास ते लवकर संपून जाण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांचा वापर काटकसरीने केला पाहिजे.
v) नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे.
प्रश्न. 4. खालील ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 5. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे ?
उत्तर :
देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे.
i) ज्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात उपलब्ध असेल त्या देशाची आर्थिक प्रगती होते.
ii) नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे मानवाच्या अनेक गरजा पूर्ण होतात. या साधन संपत्तीचा उपयोग करून मानव अनेक वस्तूंची निर्मिती करतो.
iii) नैसर्गिक साधनसंपत्तीवर अनेक उद्योगधंदे अवलंबून आहे. देशातील उद्योगधंदे भरभराटीस आले तर देशातील चलन वाढेल. पर्यायाने देशाची आर्थिक प्रगती होईल.
प्रश्न. 6. तुमच्या शाळेच्या परिसरात, घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल ? का ?
उत्तर :
शाळेच्या परिसरात, घराशेजारी अडुळसा, बेल, कडुनिंब, सदाफुली, तुळस, दालचिनी, निरगुडी, या औषधी वनस्पती लावू कारण –
i) अडुळसा – खोकला, कफ दूर करण्यासाठी
ii) बेल – अतिसारावर उपयोगी
iii) कडुनिंब – ताप, सर्दी यांवर उपयोगी
iv) सदाफुली – अर्काचा कॅन्सरवर उपयोग
v) तुळस – सर्दी, खोकला यावर उपयोगी
vi) दालचिनी – अतिसार, मळमळ यांवर उपयोगी
vii) निरगुडी – वात या व्याधीवर उपयोगी