साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय
साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास
प्रश्न. 1. एका शब्दात लिहा.
1) इंदौरच्या राज्यकारभाची सूत्रे सांभाळणाऱ्या –
उत्तर :
अहिल्याबाई होळकर
2) नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष –
उत्तर :
रघुजी भोसले
3) दिल्लीच्या गादीवर बादशाहाला पुन:स्थापना करणारे –
उत्तर :
महादजी शिंदे
4) दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे –
उत्तर :
नाना फडणवीस
प्रश्न. 2. घटनाक्रम लावा.
1) आष्टीची लढाई
2) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व
3) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.
उत्तर :
2) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व
3) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.
1) आष्टीची लढाई
प्रश्न. 3. लिहिते व्हा.
1) आहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे
उत्तर :
आहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे –
i) आहिल्याबाई होळकर यांनी नवे कायदे करून शेतसारा, करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली.
ii) पडिक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव-तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या.
iii) भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, धर्मशाळा, पाणपोया यांची उभारणी केली.
2) महादजी शिंदेचा पराक्रम
उत्तर :
i) पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली.
ii) त्यांनी डिबाॅईन फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौजी प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले.
iii) तसेच महादजींनी कादिरचा पराभव करून बादशाहाची दिल्लीच्या गादीवर पुन:स्थापना केली.
3) गुजरातमधील मराठी सत्ता
उत्तर :
i) सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली.
ii) खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदारचे पारिपत्य केले. तेथील किल्ला जिंकून घेतला.
iii) पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले.
प्रश्न. 4. मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे-चर्चा करा.
उत्तर :
मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
i) महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेला उतरती कळा लागली. या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते. उलट अनेक दोषच होते.
ii) ती मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला. मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली.
iii) इंग्रजांनी इ. स. 1817 मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे ‘युनियन जॅक’ हा आपला ध्वज फडकवला.
iv) इ. स. 1818 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.