धार्मिक समन्वय स्वाध्याय
धार्मिक समन्वय स्वाध्याय इयत्ता सातवी
Table of Contents
प्रश्न. 1. परस्परसंबंध शोधून लिहा.
1) श्री बसवेश्वर : कर्नाटक , मीराबाई :
उत्तर :
श्री बसवेश्वर : कर्नाटक , मीराबाई : मेवाड
2) रामानंद : उत्तर भागात, चैतन्य महाप्रभू :
उत्तर :
रामानंद : उत्तर भागात, चैतन्य महाप्रभू : बंगाल
3) चक्रधर : …………….., शंकरदेव :
उत्तर :
चक्रधर : महाराष्ट्र, शंकरदेव : आसाम
प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा.
प्रसारक | ग्रंथ | |
1) भक्ती चळवळ 2) महानुभाव पंथ 3) शीख धर्म | बसवेश्वर चक्रधरस्वामी गुरुनानक | कायकवे कैलास लीळाचरित्र गुरुग्रंथसाहेब |
भक्ती चळवळीचे प्रसारक – दक्षिण भारतात रामानुज, उत्तर भारतात संत रामानंद, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, गुजरातमध्ये संत नरसी मेहता, संत मीराबाई, संत कबीर.
महानुभाव पंथाचे प्रसारक – श्रीगोविंदप्रभू, म्हाइंभट
प्रश्न. 3. लिहिते व्हा.
1) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.
उत्तर :
i) संत कबीर यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले.
ii) सर्व मानव एक आहे अशी त्यांनी शिकवण दिली.
iii) संत कबीरांनी जातिभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांना हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले. या सर्व बाबींमुळे संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उद्यास आले.
2) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम.
उत्तर :
i) संत बसवेश्वरांनी कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला.
ii) त्यांनी जातिभेदाविरुद्ध भूमिका घेऊन श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले.
iii) त्यांनी आपल्या चळवळीत स्त्रियांनाही सहभागी केले.
iv) ‘अनुभवमंटप’ या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे ‘स्त्री-पुरुष’ सहभागी होऊ लागले.
v) त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली. साधे आणि निर्मळ जीवन जगावे.
अशा प्रकारचा त्यांचा संदेश होता. या त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.
प्रश्न. 4. खालील चौकटीत लपलेली संतांची नावे लिहा.
उत्तर :
i) गुरुगोविंदसिंग ii) गुरुनानक iii) सूरदास iv) कबीर v) मीराबाई vi) मन्मथस्वामी vii) रोहिदास
1 thought on “धार्मिक समन्वय स्वाध्याय”