ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा.
उत्तर :
होय. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते.
कारण – ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते.
i) या ऐतिहासिक साधनांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो.
ii) इतिहास लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वत: पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते.
iii) लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते.
iv) आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते.
v) सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते.
vi) इतिहासलेखनात लेखकाचा नि:पक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते.