आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय

आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय

आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र 

Table of Contents

प्रश्न. 1. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) संविधानातील तरतुदी – 

उत्तर : 

i) देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे संविधानातील तरतुदी होय. 

ii) संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. 

iii) तसेच संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. 

2) संविधान दिन – 

उत्तर :

संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंवर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

प्रश्न. 2. चर्चा करा. 

1) संविधान समितीची स्थापना केली गेली. 

उतर : 

i) भारताच्या संविधान निर्मितीला इ. स. 1946 पासूनच सुरुवात झाली. 

ii) स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वत: तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समितीच ‘संविधान सभा’ होय

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 

उत्तर :

i) डॉ. बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा समुदा तयार केला. 

ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपूढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. 

iii) संविधानाचा मसुदा संविधान सभेपूढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ म्हणतात. 

3) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. 

उत्तर :

देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. 

देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य, निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. 

प्रश्न. 3. योग्य पर्याय निवडा. 

1) कोणत्या देशाचे संविधान पूर्णत: लिखित नाही ?

अ) अमेरिका 

ब) भारत 

क) इंग्लंड 

ड) यांपैकी नाही

उत्तर :

क) इंग्लंड 

2) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

ब) डॉ. राजेंद्रप्रसाद 

क) दुर्गाबाई देशमुख

ड) बी. एन. राव

उत्तर :

ब) डॉ. राजेंद्रप्रसाद 

3) खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?

अ) महात्मा गांधी 

ब) मौलाना आझाद 

क) राजकुमारी अमृत कोेर

ड) हंसाबेन मेहता

उत्तर :

अ) महात्मा गांधी 

4) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

अ) डॉ. राजेंद्रप्रसाद 

ब) सरदार वल्लभभाई पटेल

क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ड) जे. बी. कृपलानी 

उत्तर :

क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न. 4. तुमचे मत लिहा. 

1) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात ?

उत्तर :

i) देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, राजकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. 

ii) कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. 

iii) अर्थात आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. या विषयांवर शासनाला कायदे करावे लागतात. 

2) 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो ?

उत्तर :

i) 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची तरतुदींनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. 

ii) या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 

3) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. 

उत्तर :

संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरूपयोग होण्याची शक्यता कमी असते. 

ii) संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. 

iii) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. 

iv) संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. 

v) संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. 

vi) नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते.    

1 thought on “आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय”

Leave a Comment