शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय इयत्ता सातवी


प्रश्न. 1. खालील तक्ता पूर्ण करा. 

 

 गाव/मौजा

 कसवा

 परगणा 

कशास म्हणतात

……………

…………..

…………..

पदाधिकारी

…………..

…………..

…………..

उदाहरण

…………..

…………..

…………..

उत्तर :

 

 गाव/मौजा

 कसवा

 परगणा 

कशास म्हणतात

कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला

परगण्याच्या मुख्य ठिकाणाला

अनेक गावांना

पदाधिकारी

पाटील 

शेटे – महाजन

देशमुख व देशपांडे 

उदाहरण

पंढरपूर, वडगाव 

इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा 

पुणे परगणा


प्रश्न. 2. म्हणजे काय ?

1) बुद्रुक 

उत्तर :

बुद्रुक म्हणले मूळ गाव होय. 

2) बलुतं 

उत्तर :

गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणतात. 

3) वतन 

उत्तर :

वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. 

प्रश्न. 3. शोधून लिहा. 

1) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक 

उत्तर :

सिद्दी

2) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार

उत्तर :

संत ज्ञानेश्वर 

3) संत तुकारामांचे गाव

उत्तर :

देहू 

4) भारूडाचे रचनाकार

उत्तर :

संत एकनाथ

5) बलोपासनेचे महत्त्व सांगणारे

उत्तर :

रामदास स्वामी

6) स्त्री संतांची नावे

उत्तर :

संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहीणाबाई

प्रश्न. 4. तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा. 

1) संत नामदेव

उत्तर :

माहिती – संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथात समाविष्ट आहे. 

कार्य – i) संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती-जमातींमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. 

ii) त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. 

2) संत ज्ञानेश्वर

उत्तर :

माहिती – संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगाचे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ, सोपनदेव हे बंधू असून मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली होती. ते वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. 

कार्य – i) संत ज्ञानेश्वरांनी ‘भगवद्गीता’ या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी ‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना केली. 

ii) त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगांतून भक्तिमार्गाने महत्त्व सांगितले. 

iii) सामान्य लोकांना आचारता येईल, असा आचारधर्म सांगितला. 

iv) वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. 

3) संत एकनाथ

उत्तर :

माहिती – संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यामध्ये भारुड, गवळणी, अभंग यांचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. ते लोकशिक्षक होते. 

कार्य – i) संत एकनाथांनी लोकांना सांगितले की, परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. त्यांनी स्वत:च्या आचरणाने ते दाखवून दिले. 

ii) उच्चनीय भेदभाव ण करता गोरगरिबांना व मागासलेल्या लोकांना जवळ करा. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, असे संत एकनाथांचे विचार होते. 

iii) त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणारांवर कडक टीका केली आहे. 

4) संत तुकाराम 

उत्तर :

माहिती – संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे होत. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची ‘गाथा’ ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. त्यांचा भक्तिला नीतीची जोड देण्यावर भर होता. समाजातील काही कर्मठ लोकांनी त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही, असा दावा करून त्यांनी तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. 

कार्य – i) संत तुकारांनी रंजल्यागांजल्यादेवत्व पाहण्यास सांगितले. 

ii) आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. 

iii) त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. त्यांनी प्राणीमात्रांवर दया करणे, श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करणे असे विचार सांगितले आहे. 

प्रश्न. 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते. 

उत्तर :

i) शेती हा सामान्य जनतेचा मुख्य व्यवसाय होता. 

ii) शेती हि मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाऊस आला नाही, तर शेतात पीक येत नसे. यामुळे धनधान्य-वस्तूंचे भाव वाढत. पर्यायाने लोकांना अन्नधान्य मिळणे कठीण जाई. तसेच जनावरांना चारा मिळत नव्हता. 

iii) पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. 

iv) गावात राहणे लोकांना कठीण जात होते. अनेक लोक गाव सोडून जात होते. लोकांवर परगंदा होण्याची वेळ येत होती. अशा दृष्काळाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे दृष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते.   

Leave a Comment