युरोप आणि भारत स्वाध्याय

युरोप आणि भारत स्वाध्याय

युरोप आणि भारत स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास 

प्रश्न.1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) इ. स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी ………………… हे शहर जिंकून घेतले. 

अ) व्हेनिस 

आ) कॉन्स्टॅन्टिनोपल 

इ) रोम

ई) पॅरिस

उत्तर :

इ. स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले. 

2) औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ ……………….. मध्ये झाला. 

अ) इंग्लंड 

ब) फ्रान्स

क) इटली 

ड) पोर्तुगाल

उत्तर :

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला. 

3) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ………………… याने केला. 

अ) सिराज उद्दौला 

ब) मीर कासीम 

क) मीर जाफर

ड) शाह आलम

उत्तर :

इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासीम याने केला. 

प्रश्न. 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) वसाहतवाद 

उत्तर :

एखाद्या देशातील काही लोक दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात जाऊन तेथे वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच ‘वसाहतवाद’ होय. 

2) साम्राज्यवाद 

उत्तर :

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वागीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच ‘साम्राज्यवाद’ होय. युरोपीय देशांच्या वसाहतवाद प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांपेक्षा बळी पडली. 

3) प्रबोधन युग

उत्तर :

युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच 13 वे ते 16 वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या काळात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटकांमुळे आधुनिकतेलासुरुवात झाली. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधन युग’ म्हणतात. 

प्रबोधन युगात ग्रीक व रोमन यांच्यात कला, स्थापत्य व तत्त्वज्ञान या क्षेत्रांत पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच मानवतावाद, माणसाची सर्वागीण प्रगती, माणसाच्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विचारांना चालना मिळाली. 

4) भांडवलशाही 

उत्तर :

उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असणे म्हणजे भांडवलशाही होय.  कमाल नफा मिळविणे हा भांडवलशाहीचा हेतू असतो. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापरांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे एकत्र येऊन त्यांनी भाग-भांडवलात कंपन्या स्थापन केल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारामुळे धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलाशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. 

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 

उत्तर :

प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला; कारण सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकत्याची वखार काबीज केली. या घटनेमुळे इंग्रजांवर चाल करून कोलकत्याची वखार काबीज केली. या घटनेमुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर इंग्रज रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळविले. त्यानंतर इ. स. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रज सैन्य व सिराज उद्दौला यांची गाठ पडली; परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे सैन्य लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 

2) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 

उत्तर :

युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले; कारण युरोपीय देशांचा आशियायी देशांशी खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, पण इ. स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कानी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना व्यापार करणे अशक्य झाले. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 

3) युरोपीय राजकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. 

उत्तर :

युरोपीय राजकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले; कारण युरोप व आशियाई देशांत व्यापरांचे पर्व सुरू झाले. नव्या सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. त्यांनी एकत्र येऊन भागभांडवलातून व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. या व्यापारी कंपन्या खूप फायदेशीर होत्या. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होऊ लागली. म्हणून युरोपीय राजकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. 

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. 

 दर्यावर्दी 

 कार्य

 ……………………..

 आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. 

 ख्रिस्तोफर कोलंबस

 ……………………..

 ……………………..

 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. 

उत्तर :

 दर्यावर्दी 

 कार्य

  बार्थोलोम्यू डायस

 आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. 

 ख्रिस्तोफर कोलंबस

 अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. 

 वास्को-द-गामा

 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. 

1 thought on “युरोप आणि भारत स्वाध्याय”

Leave a Comment