स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय
स्थिर जीवनाची सुरुवात स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2
1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
अ) शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे प्रथम इस्त्राईल आणि ………………. येथे मिळाले आहेत.
(इराण, इराक, दुबई)
उत्तर :
शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे प्रथम इस्त्राईल आणि इराक येथे मिळाले आहेत.
आ) नवाश्मयुगाच्या सुरुवातीला …………………… घरे बांधली जात होती.
(मातीची, विटांची, कुडाची)
उत्तर :
नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती.
2. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या ?
उत्तर :
एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.
i) रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे.
ii) त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे.
iii) त्यांच्यापासून दूधदुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे.
आ) समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले ?
उत्तर :
i) शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले.
ii) समूहातील सर्वाची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले. त्यामुळे, समूहातील काही स्त्री-पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन, अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. यातून कारागीर तयार झाले.
3. संकल्पनाचित्र तयार करा.
उत्तर :
4. कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा.
उत्तर :
i) कुत्रा – घराची राखण करण्यासाठी कुत्रा हा उपयुक्त प्राणी आहे.
ii) मांजर – मांजर घरातील नासधुस करणाऱ्या उंदराच्या उपद्रवापासून दूर ठेवते.
iii) गाय – गायीपासून दूध मिळते व तिच्या शेणाचा व गोमुत्राचा वापरही केल्या जातो.
iv) मेंढी – मेंढीच्या लोकरीपासून उबदार कपडे तयार केले जाते. थंडीच्या दिवसात हे उबदार कपडे आपले थंडीपासून संरक्षण करते. तसेच मांस मिळते.
v) शेळी – शेळीपासून मांस व दुध मिळते. तिच्या विष्ठेपासून खत तयार केले जाते.
5. आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो ? कसा ?
उत्तर :
आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो. पोलीस कुत्र्याला गुन्हेगाराचे ठसे असलेल्या वस्तूंचा वास घ्यायला देतात. त्याची श्वसनशक्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वाधिक असते. त्यामुळे कुत्रा या वासाच्या साहाय्याने गुन्हेगारापर्यंत पोहचण्यास पोलिसांची मदत करतो.