रंग जादुचे पेटीमधले स्वाध्याय
रंग जादुचे पेटीमधले स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) हिरवे राघू कोठे उडत आहेत ?
उत्तर :
हिरवे राघू निळ्या आभाळात उडत आहेत.
आ) निर्झर कोठून व कसे वाहतात ?
उत्तर :
निर्झर डोंगरातून खळखळ करत वाहतात.
इ) चित्रातील भिंती कशा तयार होतात ?
उत्तर :
चित्रातील भिंती चार नेमक्या रेषांनी तयार होतात.
ई) पाऊलवाटेवरून कोण येते ?
उत्तर :
पाऊलवाटेवरून सखेसोबती येतात.
प्रश्न. 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) इंद्रधनुष्यातीळ रंगांना ‘जादूच्या पेटीतील रंग’ असे का म्हटले आहे ?
उत्तर :
इंद्रधनुष्याचे सातही रंग पांढऱ्या रंगातूनच निर्माण होतात आणि त्या सर्वाना मिळून एकच पांढरा रंग होतो. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगाना ‘जादूच्या पेटीतील रंग’ असे म्हटले आहे.
आ) कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच-पाच गोष्टींची नावे लिहा.
उत्तर :
कवितेत आकाशाचा निळा रंग – i) शाई, ii) पेन, iii) टोपी, iv) ड्रेस v) फ्रॉक
कवितेत हिरवे राघू – i) शाई, ii) पेन, iii) पाने, iv) सीताफळ, v) कैरी
कवितेत पांढरा झरा – i) चांदी, ii) चंद्र, iii) फ्रॉक, iv) मोटारकार, v) शर्ट
कवितेत लाल कौलारू – i) पेन, ii) शाई, iii) दोरा, iv) निखारा, v) फूल
कवितेत जांभळ्या फुलांची – i) फ्रॉक, ii) शाई, iii) पेन, iv) जांभूळ, v) चादर
प्रश्न. 3. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
अ) आभाळ
उत्तर :
आभाळ – आकाश
आ) निर्झर
उत्तर :
निर्झर – झरा
इ) राघू
उत्तर :
राघू – पोपट
ई) घर
उत्तर :
घर – गृह
उ) वेल
उत्तर :
वेल – लता
खेळूया शब्दांशी
कवितेत ‘खिडक्यादारे’ हा शब्द आला आहे. याचा अर्थ ‘खिडक्या व दारे’ असा होतो. यासारखे आणखी शब्द शोधा व लिहा.
उत्तर :
i) ताटपाट
ii) गायीम्हशी
iii) शेळ्यामेंढ्या
iv) दगडविटा
v) तूपसाखर
कवितेत ‘सखेसोबती’ हा जोडशब्द आला आहे. सखे आणि सोबती दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या.
उत्तर :
i) गल्लीबोळ
ii) दरीखोरी
iii) डोंगरपहाड