आळाशी स्वाध्याय

आळाशी स्वाध्याय

आळाशी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 2. हे केव्हा घडते ते लिहा.

अ) पाखरांचा थवा येतो …………….

उत्तर :

पीक आल्यानंतर

आ) तान्हा रडत उठतो ……………

उत्तर :

बाप आरोळी मारतो तेव्हा

प्रश्न. 3. कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींच्या ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 4. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

उत्तर :

उठतो – फुटतो, फाटतो – फुटतो, ओला – आला, वाटतो – फुटतो, करतो – भरतो, तुटतो – फुटतो

प्रश्न. 5. स्वमत लिहा.

अ) ‘भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर :

शेतकरी उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी, निंदाई इत्यादी कामात खूप कष्ट करतो. त्यानंतर जणू आभाळाला पाझर फुटतो आणि पावसाळ्यात पाऊस पडतो.

आ) ‘शेतकरी जगाचा पोशिंदा आहे’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर :

अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करतो. पण हेच अन्न आपल्याला उपलब्ध करून देतो तो कोण ? तोच हा शेतकरी आपला मित्र, आपला पालनकर्ता, आपला पोशिंदा. शेतकरीच शेतात धान्य व कापूस पिकवतो. त्या धान्यावरच आपण जगतो आणि वस्त्रे नेसतो. म्हणजे शेतकरीच जगाचा पोशिंदा आहे.

Leave a Comment