राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याय
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न.1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली ?
उत्तर :
शिकारीला गेलेल्या राजाने ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही’ अशी शपथ घेतली.
आ) तुकडोजीमहाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत ?
उत्तर :
तुकडोजीमहाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील कवने बेभान होऊन गात असत.
इ) तुकडोजीमहाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :
तुकडोजीमहाराज यांनी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिला.
प्रश्न. 2. का ते लिहा.
अ) राजाने शिकार करण्याचे सोडले.
उत्तर :
कारण तुकडोजीमहाराजांनी त्याला ‘तुम्ही प्राण्यांना का ठार करता ?’ असा प्रश्न विचारला होता आणि राजा त्यावर निरुत्तर झाला होता. राज्याला स्वतःची चूक कळून आली होती. त्याने अहिंसेची शपथ घेतली. म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले.
आ) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजीमहाराजांना ‘देवबाबा’ म्हणत.
उत्तर :
कारण महाराज तेथील आदिवासी व गरीब लोकांमध्ये रमले होते. ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासन्तास डोलत असत. या आगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजीमहाराजांना ‘देवबाबा’ म्हणत.
इ) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा ‘राष्ट्रसंत’ पदवीने गौरव केला.
उत्तर :
कारण तुकडोजीमहाराजांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला होता. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला होता. पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात सर्वांना प्रवेश मिळवा या विचाराने समर्थन केले. आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला होता. महाराजांनी केलेल्या या सर्व राष्ट्रीय कार्यामुळे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा ” पदवीने गौरव केला.
प्रश्न. 3. तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा.
अ) श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले ?
उत्तर :
श्री गुरुदेव सेवामंडळाने चातुर्मास कार्यक्रम राबवले. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले.
आ) सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी काय केले ?
उत्तर :
सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लोकांच्या सह्या मिळवल्या.
इ) राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले ?
उत्तर :
राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशांत जाऊन भगवान बुद्धांच्या पंचशील तत्त्वांची माहिती दिली. तेथे अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठित करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.