राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली
विधाने सकारण स्पष्ट करा. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. उत्तर : पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या इ. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना आपआपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होत्या, पण त्यात एकत्रित अशी संघटना शक्ती नव्हती. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली.