मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय

मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय

मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

प्रश्न. 1. शोधा म्हणजे सापडेल.

1) प्लॅस्टिकमध्ये …………………. हा गुणधर्म आहे, म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो.

उत्तर :

प्लॅस्टिकमध्ये अकार्यता हा गुणधर्म आहे, म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो.

2) मोटारगाड्यांना …………………… चे कोटिंग करतात.

उत्तर :

मोटारगाड्यांना टेफ्लॉन चे कोटिंग करतात.

3) थर्मोकोल …………………… तापमानाला द्रव स्थितीत करतात.

उत्तर :

थर्मोकोल 100C पेक्षा जास्त तापमानाला द्रव स्थितीत करतात.

4) …………………. काच पाण्यात विरघळते.

उत्तर :

कल्कली सिलीकेट काच पाण्यात विरघळते.

प्रश्न. 2. माझा जोडीदार कोण ?

‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ
1) शिसेयुक्त काच
2) बँकेलाइट काच
3) थर्मोकोल
4) प्रकाशीय काच
5) पॉलिप्रोपिलीन
अ) प्लेट्स
आ) चटया
इ) विद्युत बल्ब
ई) इलेक्ट्रिक स्विच
उ) दुर्बीण

उत्तर :

‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ
1) शिसेयुक्त काच
2) बँकेलाइट काच
3) थर्मोकोल
4) प्रकाशीय काच
5) पॉलिप्रोपिलीन
इ) विद्युत बल्ब
ई) इलेक्ट्रिक स्विच
अ) प्लेट्स
उ) दुर्बीण
आ) चटया

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) थर्मोकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात ?

उत्तर :

थर्मोकोल पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थापासून तयार होते.

2) PVC चे उपयोग लिहा.

उत्तर :

PVC म्हणजे पॉलिविनाईल क्लोराइड.

याचा उपयोग – बाटल्या, रेनकोट, पाइप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, खेळणी, दोरखंड इत्यादी बनविण्यासाठी.

3) पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत. त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा.

(चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी, लेखणी)

उत्तर :

वस्तू कशापासून बनवितात
चटई
पेला
बांगडी
खुर्ची
गोणपाट
खराटा
सुरी
लेखनी
पॉलिप्रोपिलीन
काच
रंगीत काच
पॉलिविनाईल क्लोराइड, लाकूड
पॉलिविनाईल क्लोराइड, पॉलिस्टाइस्टर
पॉलियुरेथेन
मेलेमाइन
बँकेलाइट

4) काचेमधील प्रमुख घटक कोणते ?

उत्तर :

काचेमधील प्रमुख घटक –

i) वाळू (SiO2), सोडा (Na2CO3)

ii) चुनखडी (CaO) व अल्प प्रमाणात

iii) मॅग्नेशिअम ऑक्साईड (MgO)

5) प्लॅस्टिक कसे तयार करतात.

उत्तर :

i) प्लॅस्टिक सेंद्रिय बहुवारिकापासून बनवितात.

ii) हा मानवनिर्मित पदार्थ आहे. प्लॅस्टिकचे 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत.

iii) उष्णतेच्या होणाऱ्या परिणामावर आधारित प्लॅस्टिकचे दोन प्रकार थर्मोप्लॅस्टिक व थर्मोसेटिंग प्लॅस्टिक

प्रश्न. 4. फरक स्पष्ट करा.

1) मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ

उत्तर :

मानवनिर्मित पदार्थनिसर्गनिर्मित पदार्थ
i) मानवाने नैसर्गिक पदार्थावर प्रयोग शाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थाचे उत्पादन केले. अशा पदार्थाना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात.
ii) उदा. काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकोल.
iii) मानवनिर्मित पदार्थ हे पुननिर्मित करता येते.
iv) तसेच हे पदार्थ अविघटनशील असतात.
i) नैसर्गिकरित्या उपलब्ध पदार्थांना निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात.
ii) उदा. लाकूड, खडक, खनिजे
iii) निसर्गनिर्मित पदार्थ हे पुननिर्मित करता येत नाही.
iv) तसेच हे पदार्थ विघटनशील असतात.

2) उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक

उत्तर :

उष्मा मृदू प्लॅस्टिकउष्मादृढ प्लॅस्टिक
i) ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास उष्मा मृदू प्लॅस्टिक म्हणतात.
ii) उदा. पॉलिथीन, PVC यांचा उपयोग करून तयार होणाऱ्या खेळणी, कंगवे, प्लॅस्टिकचे ताट, द्रोण इ.
iii) हे प्लॅस्टिक मृदू स्वरूपाचे असते.
i) ज्या प्लॅस्टिकला एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्यास उष्मादृढ प्लॅस्टिक म्हणतात.
ii) उदा. घरातील विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडलवरील आवरण.
iii) हे प्लॅस्टिक कठीण स्वरूपात असते.

प्रश्न. 1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

1) पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थाचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा.

i) प्लॅस्टिक ii) काच iii) थर्मोकोल

उत्तर :

i) प्लॅस्टिक – प्लॅस्टिकचे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम – प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. प्लॅस्टिक वातावरणात अनेक वर्षापर्यंत जसेच्या तसे टिकून राहते. त्यामुळे प्लॅस्टिक वस्तूचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. बहुतेक वस्तू “use and throw” म्हणजे “वापरा आणि फेका” “फक्त एक वेळ वापरण्यासाठी” अशा स्वरूपाच्या असतात. त्यामुळे वापरून फेकलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे वातावरण प्रदूषित करीत आहेत.

ठिकठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्याची ढिगारे दिसतात ने नष्ट होत नाही. काही ठिकाणी ते नष्ट करण्यासाठी “जाळणे” ही उपाययोजना करतात. त्यामुळे तयार होणाऱ्या दूषित वायूमुळे वातावरण प्रदूषित होते व मानवी जीवनाला धोका निर्माण होतो. तसेच प्लॅस्टिक तयार करताना दूषित वायू तयार होतात.

उपाययोजना – वापरून झाल्यावर प्लॅस्टिक कुठेही फेकून न देता ते एकत्र साठवून ठेवावे व त्याची योग्य विल्हेवाट लावावी. 4R सिद्धांत वापरावा.

Reduce – कमीत कमी वापर

Reuse – पुन्हा उपयोग करा

Recycle – पुनर्चक्रिकरण

Recover – पुन्हा प्राप्त करा

यामुळे प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येईल.

ii) काच – काचेचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम – 1) काच तयार करण्यासाठी लागणाऱ्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन डाय ऑक्साइड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतो. तसेच मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. यामुळे श्वसनाचे रोग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

2) काच हा अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात.

उपाययोजना – नको असलेल्या काचेच्या वस्तू साठवून ठेवाव्यात व त्यांचा वापर पुनर्चक्रीकरणासाठी होईल असे पाहावे.

iii) थर्मोकोल – थर्मोकोलचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम – 1) थर्मोकोलच्या सतत सन्निध्यात असणाऱ्या व्यक्तींना रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

2) थर्मोकोलच्या ज्वलनात घातक विषारी वायू निर्माण होतात. त्यामुळे प्रदूषण होते.

3) थर्मोकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम करू नयेत त्यामुळे अन्न दूषित होते. ते अपायकारक असू शकते.

4) थर्मोकोलच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीला डोळे, श्वसन संस्था, पचनसंस्था या संबंधी आजार होण्याची शक्यता असते.

उपाययोजना – 4R चा सिद्धांत वापरा. थर्मोकोलचा कमीत कमी वापर करा.

2) प्लॅस्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल ?

उत्तर :

समस्या कमी करण्यासाठी 4R सिद्धांताचा वापर करा.

i) Reduce – प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करा. प्लॅस्टिक ऐवजी दुसरे काही वापरता येईल का याचा विचार करा. जसे प्लॅटिक पिशव्याऐवजी कापडी, कागदी पिशव्या इत्यादी.

ii) Reuse – वापरलेली वस्तू फेकून न देता तिचा पुन्हा वापर करा.

iii) Recycle – नको असलेल्या वस्तू पुनर्चक्रीकरण करा. जुन्या टाकावू प्लॅस्टिकचा उपयोग करून त्यापासून नवीन वस्तूची निर्मिती करा.

iv) Recover – Recycle करून नवीन वस्तू मिळवा.

अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या नियंत्रित वापराने प्रदूषणाचा धोका टळेल व समस्या कमी होतील.

प्रश्न. 6. टिपा लिहा.

1) काच निर्मिती

उत्तर :

i) काच निर्मितीसाठी लागणारी कच्ची सामग्री –

काच बनविण्यासाठी वाळू SiO2, सोडा Na2CO3, चुनखडी CaO आणि अल्पप्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साइड लागते.

ii) भट्टीमध्ये गरम करणे – काच निर्मितीसाठी वरील मिश्रण भट्टीमध्ये 1700°C तापमानापर्यंत गरम केल्यास वितळते. काचेचा एकजीव द्रव तयार होते. पण जर वरील मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे मिसळले तर सुमारे 850°C तापमान पर्यंत मिश्रण वितळते. काच तयार होते. हे मिश्रण 1500°C पर्यंत तापवितात. त्यामुळे आपणास पारदर्शक काच मिळते. या काचेला सोडा लाईम काच म्हणतात.

2) प्रकाशीय काच

उत्तर :

i) वाळू, सोडा, चुनखडी, बेरिअम ऑक्साइड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशित काच तयार होते.

ii) या काचेपासून चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनवितात.

3) प्लॅस्टिकचे उपयोग

उत्तर :

प्लॅस्टिकचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

 थर्मोप्लॅस्टिक
 पॉलिविनाईल कलोराइड (PVC) बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी.
 पॉलिस्टाइरीन (PS)रेफ्रिजरेटरसारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर , खेळणी, वस्तूंची संरक्षक आवरणे उदा. सी. डी., डिव्हिडींचे कव्हर, इत्यादी
 पॉलिइथिलीनदुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप इत्यादी
 पॉलिप्रोपिलीन लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे इत्यादी.
 थर्मोसेटिंग
 बॅकेलाईट रेडिओ, टिव्ही, टेलीफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू कुकरच्या हँडलवरील आवरण इत्यादी
 मेलेमाईन कपबश्या, प्लेट, ट्रे यांसारख्या गृहोपयोगी वस्तू विमानाच्या इंजिनचे काही भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादी.
 पॉलियुरेथेनसर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट्स इत्यादी
 पॉलिइस्टरतंतुकाच बनविण्यासाठी वापर, लेझर प्रिंटर्सचे टोनर्स, कापड उद्योग इत्यादी

Leave a Comment