भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू राहिल्या
उत्तर :
इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतात नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पश्चिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातिभेद, उच्च-नीच असा भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ठ प्रवृत्तीने निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती म्हणून भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरूच राहिल्या.