शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात

शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात ?

उत्तर :

i) शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते.

ii) प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता.

iii) शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असतात त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.

iv) परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वत:ची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात.

Leave a Comment