सण एक दिन स्वाध्याय

सण एक दिन स्वाध्याय

सण एक दिन स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे ?

उत्तर :

बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधले आहे.

आ) अवखळ कोण आहे ?

उत्तर :

तरुण बैल अवखळ आहेत.

इ) बैलांच्या गळ्यात काय आहे ?

उत्तर :

बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा आहेत.

ई) झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते ?

उत्तर :

झुलीखाली बैलांच्या पाठीवर चाबकांचे वळ असतील असे कवीला वाटते.

उ) वर्षभर बैल काय करतात ?

उत्तर :

वर्षभर बैल मालकासाठी मरे मरे तो ओझी वाहतो.

प्रश्न. 2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) या सणाला बैलांना कसे सजवतात ?

उत्तर :

या सणाला बैलांची शिंगे रंगवतात. त्यांच्या कपाळांवर बाशिंगे बांधतात. पाठीवर ऐनेदार झुली चढवतात. गळ्यांत घुंगुरुमाळा घालतात. अशा प्रकारे बैल पोळा या सणाला बैलांना सजवतात.

आ) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात ?

उत्तर :

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात. वाजंत्री वाद्ये वाजवून व लेझीम खेळत त्यांना मिरवत नेतात.

इ) बैलाला वेसण का घातलेली असते ?

उत्तर :

बैलाला वेसण (नाकातली दोरी) घालण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या हाताळणीस व मार्गदर्शनास सोपे होणे. वेसण बैलाच्या नाकातल्या मृदू भागात असते, त्यामुळे शेतकरी किंवा मालक त्याला हळूच ओढून योग्य दिशेने चालवू शकतो.

ही वेसण म्हणजे बैलावर नियंत्रण ठेवण्याचे एक पारंपरिक साधन आहे, जेणेकरून तो कोणतीही हानी न करता शेतात काम करेल किंवा मिरवणुकीत योग्यरित्या चालेल. तसेच, वेसण केवळ नियंत्रणासाठी नसून, ती शिस्त आणि मालकाच्या आज्ञेप्रती बैलाची सजगता दर्शवते.

ई) ‘सण एक दिन’ असे कवी का म्हणतो ?

उत्तर :

बैलपोळ्यालाच फक्त बैलांचे कौतुक होते. बाकी वर्षभर त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारले जातात. त्यांना ओझी वाहावी लागतात. म्हणून ‘सण एक दिन’ असे कवी म्हणतात.

प्रश्न. 3. खालील सणांच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू वापरतात ?

अ) गणेशोत्सव

उत्तर :

गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सजवलेला चौरंग, मूर्तीच्या सभोवती विजेच्या दिव्यांची रोषणाई, थर्माकोलच्या विविधचित्राकृती.

आ) दिवाळी

उत्तर :

विजेच्या दिव्यांच्या माळा, तेलाचे किंवा मेणाचे दिवे, दारांना फुलांची व पानांची तोरण, आकाशदिवा.

इ) ख्रिसमस

उत्तर :

ख्रिसमस झाडावर दिव्यांची आरास. प्रत्येक घरीचांदणीसारखा चमचमणारा आकाशदिवा

प्रश्न. 4. जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
अ) रंगवलेली
आ) शोभिवंत
इ) दुलदुलणारी
ई) अवखळ
1) गोंडे
2) खोंडे
3) शिंगे
4) वशिंडे

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
अ) रंगवलेली
आ) शोभिवंत
इ) दुलदुलणारी
ई) अवखळ
3) शिंगे
1) गोंडे
4) वशिंडे
2) खोंडे

प्रश्न. 5. बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलाला काय वाटत असेल, याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा.

उत्तर :

बैलपोळ्याचा दिवस संपल्यावर बैलाला खूप समाधान आणि आनंद वाटत असेल. दिवसभर सगळ्यांनी त्याच्यावर प्रेम, माया आणि जिव्हाळा दाखवला. सकाळी त्याला अंघोळ घालून स्वच्छ केलं गेलं, अंगावर रंग घातले, शिंगांना सजावट केली. गळ्यात मण्यांचे हार, घंटा आणि गोंडे बांधले गेले.

मालकाने त्याच्यावर ओवाळणी केली, गोडधोड खायला दिलं, आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला नेलं. एवढं लक्ष, आपुलकी आणि जपणूक मिळाल्याने त्याला मनापासून आनंद झाला असेल. तो स्वतःला भाग्यवान समजत असेल आणि विचार करत असेल – “आज माझ्या मेहनतीची सर्वांनी आठवण ठेवली, माझ्यावर खूप प्रेम केलं… हे प्रेम असंच कायम राहो!”

हे करून पाहा

मातीचे बैल बनवून त्यांना रंग द्या व सजवा.

उत्तर :

माहिती मिळवूया

खालील मुलांना काय काय आवडतं ते दिलंय. त्या वस्तू/पदार्थाविषयी विशेष माहिती देण्यासाठी कोणकोणते शब्द वापरता येतील, याची चर्चा करून तक्ता पूर्ण करा.

नाव आवडणारी गोष्ट/पदार्थ विशेष माहिती देणारे शब्द
अमिता पेरू गोड, हिरवा, पिकलेला, …………
रजनी पाऊस बुरबुर, ………..
जियाआइस्क्रीम थंडगार, ………..
राजसी शेंगदाणे ………..
दिनेश नदीकाठ ………..

उत्तर :

नाव आवडणारी गोष्ट/पदार्थ विशेष माहिती देणारे शब्द
अमिता पेरू गोड, हिरवा, पिकलेला, कच्चा
रजनी पाऊस बुरबुर, रिमझिम
जियाआइस्क्रीम थंडगार, गोड
राजसी शेंगदाणे भाजलेले, खारे
दिनेश नदीकाठ हवेशीर, सुंदर

Leave a Comment