माळीव गाव : एक घटना स्वाध्याय
माळीव गाव : एक घटना स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
वरील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत ?
उत्तर :
पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीण गाव 30 जुलै 2014 रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले. या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत.
2. माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती ?
उत्तर :
माळीण गावात साधारण 40 ते 50 कुटुंबे राहत होती.
3. कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता ?
उत्तर :
‘नासा’ या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता.
4. मदतीची घोषणा कोणी केली ? कशा स्वरूपात ?
उत्तर :
राज्य सरकारने मदतीची घोषणा पैशांच्या स्वरूपात केली.
5. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले ?
उत्तर :
ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले.
6. ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ?
उत्तर :
ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी ‘ एन. डी. आर. एफ.’ ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
7. माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली ?
उत्तर :
माळीण गावाबाबतची दुर्घटना वर्षा ऋतूत 30 जुलै 2014 या दिवशी घडली.
8. शोध कार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले ?
उत्तर :
मोबाइल टॉवर्स व वीजपुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले.
9. माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली ?
उत्तर :
माळीण गावातील लोकांना ‘एन. डी. आर. एफ.’ डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली.
विचार करा. शोध घ्या.
1. या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
i) पर्यावरणाचा असमतोल
ii) सरकारी यंत्रणेची अनास्था
iii) निसर्गाचा प्रकोप
iv) नासाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
2. नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते, याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा.
उत्तर :
नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्र आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचे नासा ही संक्षिप्त रूप आहे. भौगोलिक घटनांशीसंबंधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे.
3. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील ? विचार करा व लिहा.
उत्तर :
दुर्गम भागामुळे दुर्घटना उशिरा कळते. वैद्यकीय मदत तत्काळ मिळत नाही. पाणी व वीजपुरवठा खंडित होतो. अन्नपुरवठा तत्काळ होत नाही. आपत्कालीन यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही. खूप जीवितहानी होते.
4. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा.
उत्तर :
i) बाबांना एक दिवसाचा पगार पाठवण्यास सांगू.
ii) शाळेतून आवश्यक ती मदत शिक्षकांना करायला सांगू.
iii) महिन्याचे खाऊचे पैसे देऊ.
iv) मदतीच्या पथकात कार्यरत होऊ.
v) अन्न, पाणी व वस्त्रांचा पुरवठा करू.
आपण समजून घेऊया.
खलील चित्राचे निरीक्षण करा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील चौकटीत लिहा.

1. कलिंगडाचा आकार कसा ?
उत्तर :
गोल
2. कलिंगडाचा रंग कोणता ?
उत्तर :
लाल
3. कलिंगडाची चव कशी ?
उत्तर :
गोड