कठीण समय येता स्वाध्याय
कठीण समय येता स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. का ते सांगा.
अ) पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले.
उत्तर :
कारण असे केले नसते तर बैल प्राणाला मुकले असते.
आ) गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता.
उत्तर :
कारण त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता.
इ) मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला.
उत्तर :
कारण त्याला गड्ड्यावर पडलेले ऊस काढायला विद्यार्थ्याची मदत हवी होती.
ई) गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती.
उत्तर :
कारण आई जिवंत राहील की नाही अशी तिच्या मनात शंका होती.
प्रश्न. 2. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली, हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल ?
उत्तर :
त्या तरुणांना बैल दिसला नाही. गाडीवान दिसला. मुलगी दिसली. पण गाडीवानाची बायको मात्र दिसली. खड्ड्यावर उसाचा ढिकारा होता. त्यावरून गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली होती, हे त्या दोन तरुणांनी ओळखले.
आ) शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थाळाकडे का निघाले ?
उत्तर :
गाडीवरून आलेल्या एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना घडलेल्या अपघाताबाबत सांगितले आणि अपघातात गाडीखाली अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी मुलांची मदत मागितली. मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तरी त्या बाईचा जीव वाचू शकेल ही तरुणाने केलेली विनंती ऐकून त्या अपघातामध्ये अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले.
इ) गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते ?
उत्तर :
तरुणांनी फोन करून कारखान्याच्या अधिकाऱ्यांना अपघाताची बातमी कळवली. अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी गाडीवानाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गाडीवान गहिवरला. म्हणून गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते.
प्रश्न. 3. या पाठातील खालीलपैकी कोणाची भूमिका तुम्हांला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली ? का ते सांगा.
अ) पत्रकार आ) शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी इ) मुख्याध्यापक ई) कारखान्याचे अधिकारी
उत्तर :
या पाठातील पत्रकारांची भूमिका आम्हांला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली.
कारण i) त्यांनी बैलांच्या गळ्यातील फास मोकळा, करून बैलांचे प्राण वाचवले होते.
ii) शाळेत शिक्षकांना भेटून विद्यार्थ्याची मदत घेतल्यामुळे गाडीवानाच्या बायकोला वाचवले होते.
iii) कारखान्यातील अधिकाऱ्यांना फोन केल्यामुळेच अधिकारी घटनास्थळी आले होते आणि त्यांनी गाडीवानाला मदतीचे आश्वासन देऊन गाडीवानाला धीर दिला होता.
iv) सुमोमध्ये घालून गाडीवानाच्या बायकोला दवाखान्यात नेले होते.
v) या घटनेला वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली होती. म्हणून पत्रकारांची भूमिका आम्हांला सर्वात महत्त्वाची वाटते.
प्रश्न. 4. वाक्यात उपयोग करा.
अ) प्रसंगावधान राखणे
वा. उ. – शिवाजी महाराजांनी प्रसंगावधान राखून अफजलखानाचा वध केला.
आ) काळजात धस्स होणे
वा. उ. – ताडोबा अरण्यास आमच्या जीपसमोर वाघ उभा असलेला पाहताच आमच्या काळजात धस्स झाले.
इ) भेदरलेल्या नजरेने पाहणे
वा. उ. – चोर पोलिसांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होता.
ई) हायसे वाटणे
वा. उ. – किर्र जंगल पार करून जेव्हा आम्ही गावात येऊन पोचलो तेव्हा कुठे आम्हाला हायसे वाटले.
उ) डोळे पाणावणे
वा. उ. – मुलगी सासरी जाताना आईचे डोळे पाणावतात.
ऊ) प्रसंगाचे गांभीर्य जाणणे
वा. उ. – मोहन नुसता विनोद करत असतो. पण प्रसंगाचे गांभीर्य जाणून याने स्मशानात विनोद केला नाही.
ए) मार्गी लावणे
वा. उ. – सुचेल ती उत्तरे देऊन मंत्र्याने पत्रकारांना मार्गी लावले.
ऐ) निपचीत पडणे
वा. उ. – उभा असलेला हरी एकाएकी खाली कोसळला व निपचीत पडला.
प्रश्न. 5. पाठातील विरूद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर :
i) कच्चे X पक्के
ii) श्वास X उच्छ्वास
प्रश्न. 6. या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पहिली असेल किंवा ऐकली असेल, तर त्या घटनेचे वर्णन करा.
उत्तर :
चंद्रपूर जिल्ह्यातील घटना. चंद्रपूरला एका मुलीचे साक्षगंध होते. मुलगा वणीचा होता. मुलाकडच्यांनी चंद्रपूरला जाण्याकरिता एक ट्रॅव्हल्स केली. मुलाकडचे सर्व नातलग त्या ट्रॅव्हल्समध्ये बसले. ट्रॅव्हल्स वणी-चंद्रपूर मार्गाने धावू लागली. रस्त्यात ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला समोरून एक मारोती कार भरधाव वेगाने येताना दिसली. अपघात होऊ नये म्हणून ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला वळवली. तेथे उतार असल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटली. एकाच घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना चंद्रपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.
प्रश्न. 7. खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा.
i) बाइक
उत्तर :
बाइक – दुचाकी
ii) प्लीज
उत्तर :
प्लीज – कृपया
iii) शॉक बसणे
उत्तर :
शॉक बसणे – धक्का बसणे
iv) फ्रॅक्चर
उत्तर :
फ्रॅक्चर – अस्थिभंग
v) अँब्युलन्स
उत्तर :
अँब्युलन्स – रुग्णवाहिका
खालील संवाद वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या.
1) कोणते सर्वनाम कोणत्या नामासाठी आले ते ओळखा. लिहा.
जसे : मी – बंडू स्वत:साठी वापरतो.
2) या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा.
i) बंडू : सुट्टीत मी मामाकडे गेलो होतो.
उत्तर :
मी – बंडू स्वत:साठी वापरतो.
ii) लता : आम्ही नाही गेलो कुठेही !
उत्तर :
आम्ही – लता व तिचे घरचे यासाठी
iii) बंडू : मग तू सुट्टीत काय केलंय ?
उत्तर :
तू – लतासाठी. काय – कामासाठी
iv) लता : माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत.
उत्तर :
माझ्याकडे – लता स्वत:साठी
v) मिनू : तिला वाचायला आवडतं.
उत्तर :
तिला – लतासाठी
vi) लता : तुला नाही का आवडत ?
उत्तर :
तुला – मिनूसाठी
vii) मिनू : मला पण आवडतं ना !
उत्तर :
मला – मिनू स्वत:साठी
viii) बंडू : गुरुजींनी आपल्याला वाचनाचं महत्त्व सांगितलंय
उत्तर :
आपल्याला – विद्यार्थ्यांसाठी
ix) लता : ते पटलंय आम्हांला
उत्तर :
आम्हांला – लता व विद्यार्थी यांना
x) मिनू : आपण सारे वाचूया
उत्तर :
आपण – बंडू, लता व मिनू यासाठी
xi) लता : चांगले वाचक बनूया
उत्तर :
वाचक – सर्वसाठी
शोध घेऊया
खालील सूचना फलक वाचा. खालील सूचना कोठे-कोठे असतात ते सांगा. तुमच्या शाळेच्या परिसरात कोणकोणत्या सूचनांचे फलक लावता येतील, ते मित्रांशी चर्चा करून ठरवा. तसे सूचना फलक तयार करा.

उत्तर :
असे सूचना फलक बँका, सरकारी कार्यालय, ऑफिस आणि बागेच्या मध्ये पाहण्यास मिळतात.
याच प्रमाणे शाळेतील परिसरात लावण्या सारखे सुचना फलक.
