हडप्पा संस्कृती स्वाध्याय

हडप्पा संस्कृती स्वाध्याय

हडप्पा संस्कृती स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे ?

उत्तर :

इ.स. 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खन्न प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा हे नाव मिळाले.

2) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे ?

उत्तर :

हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे.

3) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत ?

उत्तर :

हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलीचे कापड इजिप्तला पुरवत असत.

2. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल ?

जसे – स्थळविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत.

उत्तर :

i) प्राचीन स्थळांना भेटी देतांना त्या स्थळाविषयी माहिती मिळवू. तेथील प्राचीन वास्तू कोणी बांधली, केव्हा बांधली, तेथील कोरीव काम, चित्रकला याविषयी माहिती मिळवू.

ii) प्राचीन स्थळांना भेटी देतांना तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही. म्हणजेच प्रदूषण करणार नाही.

iii) प्राचीन स्थळांना भेटी देतांना तेथील पुरातन वास्तूंवर कोणालाही विकृत स्वरूपाचे लेखन करू देणार नाही. तसेच तेथील वास्तूंचे निरीक्षण करून त्याची समाजरचना, नगररचना व आर्थिक विषमता यांचा अभ्यास करू.

3. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा.

उत्तर :

4. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा.

मुख्य पिके पोशाखदागिने/अलंकार

उत्तर :

मुख्य पिके पोशाखदागिने/अलंकार
गहू, सातू (बार्ली), नाचणी, वाटाणा, तीळ, मसूर स्त्री-पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या

5. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा.

जसे – हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड.

– स्टिएटाईट दगड

i) हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू

उत्तर :

मातीची भांडी

ii) महास्नानगृहातील स्नानकुंडाची लांबी

उत्तर :

12 मीटर

iii) हडप्पा संस्कृतीत परदेशांशी चालणारा व्यापार या मार्गांनी होत असे ?

उत्तर :

खुश्कीच्या व सागरी मार्गानी

iv) हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण

उत्तर :

लोथल

6. हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.

उत्तर :

Leave a Comment