गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय
गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) आकृती पूर्ण करा.

उत्तर :

2) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
उत्तर :
वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर
आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
उत्तर :
धाडसी वृत्ती
इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
उत्तर :
ध्येयवादी
ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरता.
उत्तर :
व्यवहारी
3) कोण ते लिहा.
अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला –
उत्तर :
बचेंद्री पाल
आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर –
उत्तर :
स्वतःच
इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे –
उत्तर :
भाईसाब
ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन –
उत्तर :
अरुणिमा
4) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर :
i) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
ii) उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरा दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
iii) मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा म्हणून सहानुभूती नको होती मला.
iv) आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
v) मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.
5) अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
उत्तर :
समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर त्यांचा विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.
आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
उत्तर :
अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी. सी. च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.
6) पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

उत्तर :

7) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.

उत्तर :

8) पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.
1) Now or never !
उत्तर :
आता नाही तर कधीच नाही !
2) Fortune favours the braves
उत्तर :
शूर माणसाचा नशीब नेहमी साथ देते.
9) ‘नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील’ अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
अ) ……………..
आ) ……………..
इ) ………………
ई) ………………
उत्तर :
अ) धोकादायक पर्वत चढणे.
आ) मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे.
इ) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
ई) पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चावडा गोल फिरायचा, म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे.
10) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा.
अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
उत्तर:
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.
आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
उत्तर :
सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
उत्तर :
खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका.
ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.
उत्तर :
प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.
11) खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.
अ) सायरा आज खूप खूश होती.
उत्तर :
होती
आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
उत्तर :
टाकला
इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दूलला खूप आवडले.
उत्तर :
आवडले
ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.
उत्तर :
सुचली
12) खालील तक्ता पूर्ण करा.
| शब्द | मूळ शब्द | लिंग | वाचन | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
|---|---|---|---|---|---|---|
| 1) कागदपत्रांचे | ||||||
| 2) गळ्यात | ||||||
| 3) प्रसारमाध्यमांनी | ||||||
| 4) गिर्यारोहणाने |
उत्तर :
| शब्द | मूळ शब्द | लिंग | वाचन | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
|---|---|---|---|---|---|---|
| 1) कागदपत्रांचे | कागदपत्र | नपूसक लिंग | अनेक वचन | कागद पत्रां | चे | षष्ठी |
| 2) गळ्यात | गळा | पुल्लिंग | एक वचन | गळ्या | त | सप्तमी |
| 3) प्रसारमाध्यमांनी | प्रसार माध्यम | नपूसक लिंग | अनेक वचन | प्रसार माध्यमां | नी | तृतीया |
| 4) गिर्यारोहणाने | गिर्या रोहण | नपूसक लिंग | एक वचन | गिर्या रोहणा | ने | तृतीया |
13) स्वमत
अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. हे साफ चूक आहे. त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते. तोंड दाखवायला जागा राहत नाही. पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्की असते काय, याबाबत थोडा विचार केला पाहिजे. आपण खूप गुण मिळण्याला परीक्षेत यश मानतो. पण हे बरोबर आहे काय ? गुण महत्त्वाचे नसतात; ज्ञान महत्त्वाचे असते. गुण हे साधन असते, तर ज्ञान हे साध्य असते; आपले ध्येय असते. आपण गुणांना महत्त्व जास्त देतो. इथेच खरा घोटाळा निर्माण होतो. आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे.
ते मिळवताना अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असले तर आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जाता कामा नये, किंबहुना ती नामुष्कीसुद्धा नसते. उच्च ध्येय निवडता आले नाही तर मात्र ते अपयश असते.
आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते. एखाद्याला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडत. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल, अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच, फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे, जीवनाचा हाच महामंत्र आहे.
इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उत्तर :
आपण दिवसभर कोणती न कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळतनकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे, पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अपठित गद्य आकलन
अ) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
अ) वृक्ष बहरू लागले आहेत. …………………..
उत्तर :
वृक्ष बहरू लागले आहेत वृक्ष-पर्णानी अंग धरले आहे.
आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. …………………..
उत्तर :
नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे करंगळीची सोंड झाली आहे.
२) स्पष्ट करा.
अ) पाणी समजूतदार वाटते …………………..
उत्तर :
पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो, म्हणून ते त्या वेळी पाणी समजूतदार वाटते.
आ) पाणी क्रूर वाटते …………………..
उत्तर :
नदीकाठावरच्या गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.
आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
१)

उत्तर :

२)

उत्तर :

इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
|---|---|---|
| १) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | …………,……….. | ……….,…………. |
| २) पाणी येते आणि जाते. | ………………….. | ………………….. |
उत्तर :
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
|---|---|---|
| १) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | कुठे, वर | क्रियाविशेषण व शब्दयोगी अव्यये |
| २) पाणी येते आणि जाते. | आणि | उभयान्वयी अव्यय |
उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
पाणी हे सतत वाहणारे, गतिशील आणि स्वतंत्र स्वभावाचे असते. ते कुठेही अडलेले राहत नाही. कधी शांतपणे वाहते, तर कधी उग्र रूप धारण करून प्रवाहात वेग घेते. ते झाडांवर चढते, घाट बुडवते, आणि अखेरीस समुद्रात विलीन होते. पाणी शहाणे, सामर्थ्यवान आणि सर्जनशील आहे – ते अडथळ्यांवर मात करून नवनिर्मिती घडवते. त्याच्या प्रवाहात उत्साह, उन्माद आणि जीवनाचा आनंद दिसतो.
थोडक्यात, पाण्याचा स्वभाव सदैव प्रवाही, अडथळ्यांवर मात करणारा आणि सृजनशील असा आहे.
वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
वर्षाऋतूत आकाशातून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पण त्यातील बराचसा पाणी निष्फळ वाहून जातो. हे पाणी साठवण्यासाठी आणि उपयोगात आणण्यासाठी माणसाने काही उपाय करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम प्रत्येकाने पावसाचे पाणी साठवण्याची (Rainwater Harvesting) व्यवस्था करायला हवी. घरांच्या छपरांवर पडणारे पाणी टाक्यांमध्ये किंवा विहिरींमध्ये साठवावे. शेतांमध्ये बंधारे, गाळे, आणि जलसंधारणाचे तळे तयार करावीत, जेणेकरून जमिनीत पाणी झिरपून भूजलस्तर वाढेल.
शेतीमध्ये डोंगर उतारावर कंटूर बंधारे बांधल्याने माती व पाणी वाहून जात नाही. गावांमध्ये आणि शहरांमध्ये जलसंधारण प्रकल्प राबवावेत. लोकांनी पाण्याची नासाडी टाळून ते जपून वापरावे. जर आपण वर्षाऋतूतील पाणी योग्य प्रकारे साठवले, तर उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी होईल आणि शेतीला, प्राण्यांना तसेच माणसांनाही पुरेसे पाणी उपलब्ध राहील.